STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

फक्त तुझी साथ हवी

फक्त तुझी साथ हवी

1 min
200

येउ दे रात्र काळोखी

नसे भीती तिमिराची

दूर करू वादळांना

चालू वाट क्षितिजाची. १.


इच्छाशक्ती दुर्दम्य ती

बळ आणू पंखातले

तुझा आधार भक्कम

स्वप्न पूर्ण मनातले. २.


फक्त तुझी साथ हवी

संकटांना झेलीन मी

अंधारात उजेडाचा

मार्ग नवा शोधीन मी. ३.


मळा फुलवू आनंदी

वाट खडतर जरी

पुष्प वाटिका सुगंधी

विश्वासाची साथ खरी. ४.


श्वास तुझा होईन मी

खाऊ घास घासातला

वचनाची सप्तपदी

जपू भाव बंंधातला. ५.


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Abstract