STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

संविधान गौरव दिन

संविधान गौरव दिन

1 min
265

विवेक साऱ्या जनाजनात,

आपला देश आपले सरकार

समता, बंधुता, लोकशाही,

संविधानाने दिला अधिकार. १.


भारताचा सार्थ अभिमान,

प्रचंड शक्ती अभिव्यक्तीची,

लोकशाही सक्षम, बळकट

संविधान परिभाषा मानवतेची. २.


नष्ट करूनी विषमता 

निर्धाराने करू स्वीकार 

समानतेचे बीज पेरू 

दर्जा ,संधी हाच आधार ३.


न्यायाने गणराज्य घडवू,

सन्मान करूनी घटनेचा

श्रद्धा उपासना स्वातंत्र्य 

विविधतेच्या एकतेचा. ४.


मिळून सारे देऊ ग्वाही,

देश चालतो संविधानाने

जागर, आदर, महानता,

ना एका धर्माने ,ना विचाराने. ५.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract