Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

मैत्रीच्या आठवणी

मैत्रीच्या आठवणी

3 mins
182


       नुकताच आमचा 26 ,27 फेब्रुवारी 2022ला, दहावीच्या बॅचचा गेट-टुगेदर कार्यक्रम पार पडला. खूप वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आम्ही सर्व बाल सवंगडी, एकमेकांना भेटलो. अवर्णनीय असा आनंद झाला. लहानपणीच्या त्या सर्व आठवणी परत ताज्या झाल्यात.त्यामुळे आता सर्व बाल मैत्रिणी, सध्या संपर्कात आहोत. वेगळाच आनंद आहे.त्यामुळे आठवणी तर अनंत आहेत.मी एका मैत्रिणीविषयी, तिच्या मैत्रीविषयी मी बोलू शकणार नाही. त्यातल्या त्यात काही शाश्वत आठवणी.

         अगदी पाचवीत असतानाची आठवण. सध्या ती मैत्रीण मीनाक्षी, गोव्यापाशी सावंतवाडीला लेक्चरर आहे. तर आठवण अशी की, गॅदरिंग साठी , आम्ही पाचवीत असताना तिचा आणि माझा डान्स बसवलेला होता. "दादा, मला एक वहिनी आण" या गाण्यावर. गाण्यामध्ये ती दादा झालेली. तिने सफारी वगैरे घातला होता. आणि मी तिची बहीण झालेली. निळ्या कलरचा, खालून छोटे छोटे घुंगरू बसवलेला, नेटेडचा परकर पोलका घालून आम्ही तयार होतो. आमच्या गाण्याची अनाउन्समेंट झाली. आणि मी घाबरून रडायला सुरुवात केली. मग कोणीतरी मला उचलून स्टेजवर आणले आणि नंतर व्यवस्थित गाणे पार पडले. आणि सांगायची गोष्ट अशी की, आता जेव्हा गेट-टुगेदर मध्ये आम्ही भेटलो, तेव्हा त्याच गाण्यावर आठवणीने डान्स केला.

          सपना गांधी, आणि मी एकाच बेंचवर बसायचो. फळ्यावरचे मला स्पष्ट दिसायचे नाही. म्हणून मी तिच्या वहीमध्ये पाहून लिहायचे. तिला पण हे माहित होते त्यामुळे ती मला खुप मदत करायची. पण एक दिवस ती शाळेत येणार नव्हती. माझे धाबे दणाणले. कारण वडिलांचा एवढा धाक होता की, ही गोष्ट त्यांना सांगायची हिम्मत नव्हती. मग त्या दिवशी पोटात दुखण्याचे निमित्त करून शाळेला दांडी मारली. पण किती दिवस? भीत-भीत वडिलांना सांगावेच लागले. आणि छान पैकी नंबरचा चष्मा लागला.

           सविता माझी मैत्रीण, emotional blackmail करायची. प्रत्येक गोष्टीत." तू माझी चांगली मैत्रीण असेल तर माझं ऐकशील" असं म्हणायची. मग काय तीचं ऐकावच लागायचं. आमच्या शाळेच्या या आवारात, घोरपडे यांचा भेळचा गाडा असायचा. तिला भेळ फार आवडायची. डब्बा खाल्ला तरी ती भेळ खाणारच. आणि मला वाटायचे ती कशी एवढी रोज पैसे खर्च करते?. खूप हेवा वाटायचा. ही पण सध्या बऱ्हाणपूरलाच असते मध्य प्रदेश.

            तृप्ती आणि मी, आम्ही एकाच गल्लीत राहायचो. शाळेला एकत्र जाणे-येणे अभ्यास एकत्र असायचा. ते गुजराती असल्यामुळे, त्यांच्या घरच्या पद्धती खूप वेगळ्या होत्या. पण रोजच्या सहवासामुळे त्यांचे कल्चर माहित झाले होते. बाथरूमला जाऊन आले तरी त्यांच्यात आंघोळ करावी लागे. कृष्ण कन्हैया ची अपार भक्ती. खाण्याच्या नवीन नवीन पदार्थांची रेलचेल असायची. तिच्याकडून गुळपापडी, तिळाची पापडी, चिवड्याच्या डाळे यांची पापडी असे वेगवेगळे पदार्थ शिकायला मिळाले. हीपण सध्या बरहानपुर ला असते मध्य प्रदेश.

          सुषमा खर्डीकर, तिचे वडील आणि माझे वडील दोघेही एकाच बँकेत नोकरीला होते. त्यामुळे कौटुंबिक संबंध होते. त्यामुळे सतत एकमेकांच्या घरी जाणे असायचे. सुनीता शिंदे, तिचे वडील तलाठी ऑफिसर होते. घराजवळच असल्यामुळे, शाळेत जाताना रोज तिच्या घरी जाण्याचा प्रसंग येत असे. तिच्या घरचे रोजच जेवण म्हणजे, ज्वारीची भाकरी आणि तुरीच्या डाळीचे वरण. रोज हेच जेवण असायचं. खूप आनंदाने, समाधानाने खाताना ती दिसायची. आपल्याला कसे तेच ते खाऊन कंटाळा येतो, पण ती कधीही या बद्दल एक शब्द बोलली नाही. मला या गोष्टीचे खूप आश्‍चर्य वाटायचे.

         आणि प्रकर्षाने आठवण व्हावी अशी मैत्रीण, कमरूनिस्सा आतार. स्वभावाने इतकी गोड आणि प्रेमळ. दिसायला गोरी गोरी पान. खूप समजून घ्यायची ती मला. खूप प्रेमळ होती. त्यामुळे तिची आणि माझे खूप जमायचे. नववीत असतानाच तिचे लग्न झाले. तिच्या चारही बहिणी मतिमंद होत्या. त्यांच्या घरात फक्त हीच चांगली होती. आत्ताच्या गेट-टुगेदर मध्ये तिचा शोध घेण्याचा बराच प्रयत्न केला परंतु, तिच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. असो, थांबते आता. नाहीतर खूप मोठा लेख होईल

      ते बालपणीचे विश्वच वेगळ असतं. आठवणीत जपावं असं. आम्ही तर त्याचा आत्ताच खूप छान अनुभव घेतला. तीच बालपणीची मैत्री वृद्धिंगत करून.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract