STORYMIRROR

Seema Kulkarni

Abstract

3  

Seema Kulkarni

Abstract

सण_संक्रांत

सण_संक्रांत

1 min
157

नववर्षाच्या प्रारंभी

सण आला संक्रांतीचा

खमंग तीळगुळाची पोळी

तर कुठे थाट पुरणाचा. १.


सुगड पुजूनी सुवासिनी

देती दान सौभाग्याचे

घर धान्याने भरो सदा

अक्षय वाण घटाचे २.


रंग काळा शकुनाचा

पैठणीवर मोर शोभतो

दागिन्यांनी हलव्याच्या

थाट नववधूचा होतो. ३.


नवबाळाची हौस वेगळी

बोरन्हाण घालुनी करती

जमती सारे गोपमंडळी

खाऊसाठी वाद घालती. ४.


पतंग महोत्सव अटीतटीचा

रंगुनी जाते काटा-काटी

आबालवृद्ध रमुनी जाती

आकाशी पतंगांची दाटी. ५.


तिळगुळ घ्या गोड बोला

 स्निग्धता अन् स्नेहाचा

विसरुनी सारे वैरभाव

आपुलकी अन प्रेमाचा. ६.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract