वियोग
वियोग
खेळ दैवाचा
परित्यक्त्या जीवनी,
पाणी नयनी १
प्रारब्ध भोग
साथ जीवनातली
आशा संपली २
काहूर मनी
आठव उचंबळे
प्रीतीचे मळे ३
अर्पून तुज
दान सौभाग्यातले
अपूर्ण झाले ४
साथ सोडूनी
भरलेल्या अंगणी
मीच चांदणी ५
वियोग कसा
साहवेना मजला
विसरू तुला ६
पूर्ण वचन
करी सप्तपदीचे
सात जन्मांचे ७