सावित्रीचे शिक्षणातील योगदान
सावित्रीचे शिक्षणातील योगदान
महिला शिक्षक/ पहिलीवहिली /
भारताची झाली/ अग्रदूत/ १
सामाजिक क्रांती/ शिक्षण प्रसार /
लावी हातभार/ क्रांतिज्योत/२
परखड बोल/ वृत्ती बंडखोर/
प्रगल्भ विचार/ सावित्रीचे/ ३
दर्जा तो स्त्रियांना /प्रोत्साहन दिले/
नाही जुमानले /समाजाला/ ४
कठोर विरोध/ धर्ममार्तंडांना /
शिक्षित स्त्रियांना /केले असे/ ५
अनिष्ट रूढींना/ बालविवाहाला/
सती प्रकाराला/ थांबविले/ ६
वसा शिक्षणाचा /प्रतिभा काव्याची /
शब्द सुमनांची /अखंडित ७