भेट
भेट
आगळी अशी भेट तुझी
काय सांगू स्थिती माझी
दृष्ट लागेल तुझला माझी
होती खबरदारी मोठी
भेट परत कशी करावी
चिंता होती खरी
प्रश्न मोठा फार होता
कारण तो जीवणाचा होता
काही तरी सांगायचे होते
धाडस माझे होत न्हवते
नाजूक तुझ्या स्वभावाला
जपायचे पार होते
तुझ्या होकारांचा वास होता
मात्र शब्दांचा त्रास होता
काहीतरी सांगायचे होते
ह्रदयी तुला दुखवयाचे न्हवते
एवढेच कारण होते
बोलणे माझे थांबले होते

