बांध
बांध
1 min
178
आसवांना माझ्या
बांध घालता येईना
तुझ्या विन मज
जगता येईना.
अर्धवटच राहिले
बघणे आपले
नात्यांचेच बहाणे
मज सोसता येईना
बदलून पाहिले
कवडसे कितीही
भास तुझा असण्याचा
जाता जाईना
घालून पाहिले बंधने
कितीही स्वतःला
तुझं विन मन हे
राहता राहिना
आसवांना माझ्या
बांध घालता येईना.
