STORYMIRROR

Vivekanand Benade

Abstract Others

3  

Vivekanand Benade

Abstract Others

साहेब

साहेब

1 min
127

साहेब तुम्ही आलात

खूप छान केलात


आहो काल पर्यंत इथला रस्ता

नुसता खड्डयांनी भरलेला

कुठनं कुठ जातोय आणि कुठ संप्तोय

याचा पत्ताच नव्हता


पण साहेब तुम्ही आलात 

खूप छान केलात


मेटाकुटीला येत होता जीव

नुसता रत्यात जाताना

गेर पडायचा की ब्रेक लावायचा 

मोठाच प्रश्न असायचा


पण साहेब तुम्ही आलात

खूप छान केलात


ट्रक गेला शेजारन तर

धुळीन तोंड माखायच

कवा टायरीतन दगड निघून

तोंडावर बसलं सांगता यायचं न्हाई


पण साहेब तुम्ही आलात

खूप छान केलात


काल चां वेगळा होता रस्ता आणि 

आजचा वेगळा आह साहेब

तुम्हाला धक्का लागलं म्हणून रात्रीच

डांबर वतलय खड्यात 


दगड काय साहेब 

माती पण आज दिसत नाही

रस्ता साप दिस्तूया आज

 नुसता रस्ता पांढऱ्या पट्याट

उठून दिसतोय 

 

साहेब तुम्ही आलात 

 खूप छान केलात


कडला पडलेला तो भिकारी

आज दिसत नाही

तोच की फाटक्या प्लॅस्टिकच्या

पिसवित खायचा कायबाय


पण साहेब तुम्ही आलात

खूप छान केलात


तुम्ही नका विचार करू 

त्याला न्हेल असल कुठ तरी 

नाही तर संपलावला बी असल

उगाच किळसवाणे वाताय नको म्हणून


रस्ता निम्मा झुडप्यानी

घेरलेला आज बुलडोझरन

पुरा साप केलेला दिसतोय

मोकळा श्वास घेताना दिसतोय


साहेब तुम्ही आलात 

खूपच छान केलात


साहेब एक सांगतो

यायच्या आगोदर एक फोटू घेत जावा

आल्यावर तोच रस्ता आहे का

जरा नीट बघत जावा


साहेब तुम्ही आलात

खूप छान केला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract