STORYMIRROR

Vivekanand Benade

Drama Tragedy Inspirational

3  

Vivekanand Benade

Drama Tragedy Inspirational

शांत बसावे म्हणतो !"

शांत बसावे म्हणतो !"

1 min
164

आत्ता थोडे शांत बसावे म्हणतो

होईल तसे गप्प बघावे म्हणतो

तू मागशील तसे मी देतच राहिलो

आत्ता थोडे त्याला नकार द्यावा म्हणतो ....

उगीचच हृदयात अडकत राहिलो

त्याला थोडीशी बगल द्यावी म्हणतो...

बूद्धी जरा अडकते जाळ्यात

तिला तोडे व्यवहार शिकवावे म्हणतो...

जगून झाले भरपूर या जगात

आत्ता जरा मरण भोगावे म्हणतो.....

नात्यांचे जाळे खुप झाले विणून

बांध कर्तव्याचे तोडावे म्हणतो....

समोरच्या च्या सौदर्याचे गुण खूपच गायले

आत्ता थोडे स्वतःलाच बघावे म्हणतो.....

भेटून झाले इतरांना भरपूर

आत्ता स्वतःलाच जरासे भेटावे म्हणतो....

आत्ता थोडे शांत बसावे म्हणतो

होईल तसे गप्प बघावे म्हणतो.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama