STORYMIRROR

Vivekanand Benade

Abstract Tragedy

3  

Vivekanand Benade

Abstract Tragedy

आरसा

आरसा

1 min
165

सहजच मी मला विचारले

कसा आहेस,

आरश्या सामोरं स्वतःला न्याहाळत

आहे बरा म्हणालो....


नाही मिळवता आहे डोळे

चुकून खरे बोलतील म्हणून

आपसूकच मान खाली झुकली

स्वतःची ओळख होऊ नये म्हणून


कुठून कुठे प्रवास

झपाझप चित्र समोरून गेली

कुठे हासू आणि कुठे रडू

येवढ्यातच कंठ आले भरून ...


किती तरी वर्ष निघून गेली

बालपन आत्ता आठवत नाही

काही तरी आठवले तरी

स्पष्ट अस काही दिसत नाही....


स्तब्ध आणि एकांतात

स्वतःलाच भेटायचं म्हणत होतो

कश्याला कश्याचा तरी मेळ

बसतोय का हेच बघाव म्हणून..


हे,ते,यांचे त्यांचे कश्याचां

घालावा कश्याला मेल

आजुन ही बोचतात काही क्षण

कोणाला तरी त्रास दिला होता म्हणून...


सोसले होते की मी पण सारे

हट्ट कधी कुठे  केला होता का

आत्ताही कुठे करतो ,

स्वतःसाठी तरी कुठे जगतो


आठवणींच्या महापुरात

काहीं क्षण आनंदाचे पण आले

हसरा झाला चेहरा

आठवणीत होते कोणीतरी म्हणून..


आरश्याने ठणकावले

माझ्यात काय बघतोस

स्वतःला स्वतचं बघत जा

इवलेसे जगणे आनंदात जगात जा...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract