बापू
बापू
बापू तुम्ही परत जन्माला यायला हवं
देश परत गुलामी मध्ये चाललाय
त्याला तुमच्या काठीने सावरायला हवं
बापू तुम्ही परत यायला हवं
भाईयो औंर बहिनो ची हाक
धडकी भरवणारी वाटतेय
नवीन कश्याचे तरी भाव वाढणार
याचे समीकरण जोडावेसे वाटतेय
बापू तुम्ही परत यायला हवं
आज काल मानस स्वतःला
देशाचे राजे समजायला लागलेत
त्यांना तुमच्या गांधीगिरीने
पायाखाली घ्यायलाच हवं
बापू तुम्ही परत यायला हवं
करोडो वर्ष धर्मांतर झाले नाहीत
तेवढे याच वर्षी होत आहेत
का एवढी अवहेलना भारताची
ते तुम्हालाच बघाव लागेल
बापू तुम्हीला परत यावच लागेल
नुसताच मन की बात
तुम्ही कधी केली होती का
माईक च्या आडाने,समोर न येताच
भाषण तुम्ही दिली होती का
दोन कोटींचा कोट घालायला
GST चा मुलामा बाळाच्या दुधाला
असा देश होईल म्हणून तुम्ही
कधी विचार केला होता का
यांच्या फोटो शिवाय
कोणताच कार्यक्रम होत नाही
तुम्हीला जग सारे मानत होते
ते तुम्ही जरा तरी दाखवलं का हो
बापू तुम्ही परत जन्माला यायलाच हवं...
