STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Romance

3  

Namita Dhiraj Tandel

Romance

जेव्हा आपण प्रेमात पडतो

जेव्हा आपण प्रेमात पडतो

1 min
222

जेव्हा आपण प्रेमात पडतो,

तेव्हा प्रेमाची नौका विचारांच्या डोहात पार बुडते..

भवऱ्या प्रमाणे एक गोळा पोटात येऊन,

पहिल्यांदाच मन व्याकुळ होत असते..


जेव्हा आपण प्रेमात पडतो,

तेव्हा प्रेमाची भावना व्यक्त कशी करावी सुचत नसते..

मनातले शब्द ओठांवर थांबुन,

हृदयाची धडधड निरंतर वाढत असते..


जेव्हा आपण प्रेमात पडतो,

तेव्हा झोप देखील गडप होऊन जाते..

निरव शांततेत प्रेम तरंग ऊठुन,

मनाची खळखळ स्पष्ट ऐकू येत असते..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance