STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Romance Classics Inspirational

2  

Namita Dhiraj Tandel

Romance Classics Inspirational

तु फुलांच्या गंधासारखा

तु फुलांच्या गंधासारखा

1 min
49

तु चाफ्याच्या फुलांसारखा 

प्रेमात बेधुंद करणारा असा..

अलगद ओंजळीत येताच 

मोहक स्पर्शाने प्रेम करायला लावणारा..


तु मोगऱ्याच्या फुलांसारखा 

मनी पानात बहरलेला असा..

नाजुक क्षणांना कुरवाळत येताच 

स्पंदन गंधाळून टाकणारा..


तु प्राजक्ताच्या फुलांसारखा 

अंगणी सडा आठवणीतला असा..

अनोख्या परडीत भावना वेचत येताच 

क्षणभंगुर स्नेह गुंफण हिरावुन घेणारा..


तु सोनटक्का फुलांसारखा 

अंतरी सुगंध कुपीतला असा..

सुवासिक पाऊलवाट खुणावत येताच 

परिमळ स्वप्नांच्या मंद झुळुकी भुलवणारा..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance