STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Inspirational

4  

Namita Dhiraj Tandel

Inspirational

मिलन

मिलन

1 min
233

वैशाख वणव्यात

वसुंधरा होरपळली..

ज्येष्ठ पाऊसाची सर

तिला ओढ लावू लागली..


कृष्ण ढगाईच्या छटा

आभाळभर पसरल्या..

चमकत्या विजेचा लखलखाट

तिला बंदिस्त करू लागला..


आसुसलेल्या क्षणांच्या 

मिलन घटिका जुळल्या..

मृद गंधाचा नाद खुळा

तिला विसावू लागला..


अंत समयी विरहाच्या 

अविरत धारा बरसल्या..

मेघ सावळा धरतीला 

अलवार भिजवू लागला..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational