STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Romance

3  

Namita Dhiraj Tandel

Romance

सावळरंग

सावळरंग

1 min
122

कृष्णा ! मला नव्हती खेळायची तुझ्या सोबत रंगपंचमी,

प्रेमाचे प्रतीक म्हणवत तुच उधळली पुष्पवर्षावाची खेळी..

खरं तर तुलाच रंगायच होतं माझ्या गौर वर्णात

मग का बरं रंगवून सोडलं मला तुझ्या प्रेमरंगात?

तुझा गोकुळचा निरोप अपार वेदनादायी,

काहूर सांजवेळी विरहाचे आभाळ दाटले मनअंगणी..

अस्तास जाणारा सूर्य देखील गेला गुलाल उधळत,

तोही लावत होता का हजेरी द्वापारनगरीच्या आगमनात?

मज म्हणालास, 'काही प्रश्नांची उत्तर गवसत नसती,'

अरे! मोहना पण राधा नावाची धार तुझ्या लोचनी ओसंडत होती..

तु मागे वळून पाहताच मी गेले असते ना रे वाहवत,

नानारंगी भूमिका करायला एक तुलाच कसं रे जमतं?

दिवस असो की रात्र वसंताची किमया आगळी,

क्षितिजापल्याड राधा एक प्रवासी होऊन राहिली,.

यौवनात सृष्टीची झुळूक सुखदायी स्वरूपात,

मोहमायेची स्मृतीपुष्प का बरं होरपळती वैशाखवणण्यात?

चराचरी रंगात श्रीरंग नामाची वस्ती,

तुझ्या अस्तित्वाचे दर्शन प्रेमऋतू वसंतात सजती..

मज नेई ती मोरपंखी पाऊलवाट भान हरपत,

कृष्णा ! सावळमायेत रंगवूनी जाताना तुला काहीच कसं वाटलं नाही?



विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Romance