आठवणीच्या क्षणांची कुपी
आठवणीच्या क्षणांची कुपी
प्रत्येकाचा बालपणापासूनचा इतिहास..
आई बाबांशिवाय काही तास पहिल्यांदाच
शाळेच्या विश्वात पदार्पण करत असतो..
कोणीच नसतं त्या जगात ओळखीचं
म्हणून प्रचंड रडू कोसळून पडत असतं..
शाळेची पहिली पायरी बालवर्ग..
असतो एकमेंकांशी अजाण तरीही
एका बट्टीने मैत्री होत असते..
भांडण झाल्यावर कट्टी सुद्धा घेतली जाते
मात्र रुसल्यावर मनवणं देखील होत असतं..
गोड क्षणांच्या आठवणींची कुपी..
पेन्सिलचा प्रवास संपुन हातात
पेन कधी येतं कळ
तंच नाही..
एकमेकांना अभ्यासात मदत करत जणू
आयुष्याचं गणितच सोडवलं जात असतं..
वर्षा मागे वर्ष सरत येणारा निरोप समारंभ..
शाळा आणि शाळेचे मौल्यवान क्षण
पुन्हा कधीच परत येणार नाही..
अश्या विचारांनी एकमेकींना न्याहाळत
अश्रूं लपवत मनाला सावरलं जात असतं..
अगदी भुगोला सारखं..
बालवर्गात कोणी नसतं ओळखीचं म्हणून
इवलासा जीव घाबरून गेलेला असतो..
मात्र शाळा आयुष्यभर सोडण्याच्या विरहात
पुन्हा आभाळभर रडू कोसळून पडत असतं..