सण दिवाळी
सण दिवाळी
सोनेरी पहाट समवेत सण दिवाळी येती,
लक्ष दिव्यांनी सृष्टी लख्खमय करती..
अज्ञानाचा अंधकार बाजुला सारूनी,
दाही दिशांत ज्ञान प्रकाश पसरती..
सुशोभित आकाश कंदील शोभती
नव्या दिशांच्या नव्या ज्योती उजळती..
रंगीत रांगोळी भरजरी शालू नेसूनी,
झेंडू फुलांच्या मुंडावळ्या दाराशी बांधती..
अभ्यंगस्नानी सुगंधित उटणे कीर्तीची दरवळ देती,
परंपरेची गुरुकिल्ली आरोग्यास निरोगी ठेवती..
पाडव्या दिनी गोड फराळ आप्तेष्टांस देऊनी,
लक्ष्मीपूजनी लेकीला लक्ष्मी म्हणुन पुजती..
सैनिकहो!
मातृभूमीच्या संरक्षणाचे वचन तुम्ही घेती,
सणाच्या दिवशी तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढती..
निस्वार्थ बहिणींची वेडी माया तुम्हा भाऊरायावर करुनी,
स्नेहाचा टिळा मनाशी लावत भाऊबीजेची ओवाळणी करती..
