STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Classics

3  

Namita Dhiraj Tandel

Classics

कागद

कागद

1 min
196

पिवळसर कागदावर,

हळव्या शाईने कोरलेली..

आठवणीच्या क्षणाची पानं,

थोडी सैलसर झालेली..


कोऱ्या कागदावर, 

अंतरीचा ठाव घेतलेली..

अर्थाची गुंफण माळ,

दूरवर लांब गेलेली..


शेवटी कागदावर,

अव्यक्त भावना जोडलेली..

ओळींच्या पुसट स्मृती,

मनाची सांगता केलेली..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics