STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Children Stories

2  

Namita Dhiraj Tandel

Children Stories

बालपण एक सुखद काळ

बालपण एक सुखद काळ

1 min
31

अथांग आठवणींनी सजलेलं बालपण

निरंतर काळा पर्यंत सुखावणारं..

निरागस क्षणांची गोड आठवण 

निसटत चाललेल्या वेळात स्मरण देणारं..


लडिवाळ आठवणींनी भरलेलं बालपण

अलवार गोंजरे पर्यंत दुःखावणारं..

अफाट गोष्टी मनाच्या कोपऱ्यात 

दाटून धरलेल्या डोळ्यांत आसवं देणारं..


आनंदी आठवणींनी हरवलेलं बालपण

लहानपणी पर्यंत मोठेपण बाळगणारं..

धावपळीच्या दुनियेची सफर घडवत

खऱ्या आनंदाला विरहाचा गुंता देणारं..


Rate this content
Log in