STORYMIRROR

Namita Dhiraj Tandel

Romance Classics Inspirational

2  

Namita Dhiraj Tandel

Romance Classics Inspirational

सोनटक्का

सोनटक्का

1 min
147

पांढऱ्या रंगाच्या फुलाला

अति नाजूक पाकळ्या

मनाची प्रसन्नता निरंतर जपती

शुभ्रवसन सोनटक्का


उमलते कळी तिन्ही सांजेला

कोमेजुन जाते दुसऱ्या दिवसाला

किंचित हाताळणीने मलिन होती

सात्विक सोनटक्का


दिसताच क्षणी मोह आवरेना मनाला

क्षणात उचलून येते ओंजळीत

नकळत स्पर्श नाकास करती

लक्षवेधी सोनटक्का


येता जाता जीव वेडावला

पर्जन्य ऋतूत सुमन गंधाची दरवळ

मंद झुळूकी परिमळ मन भुलवीती

सुवासिक सोनटक्का


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance