STORYMIRROR

Shila Ambhure

Children

3  

Shila Ambhure

Children

आमची ग्रॅनि

आमची ग्रॅनि

1 min
25.4K


आजी ही आमची

लय लय भारी

ग्रॅनि म्हणतात

नातवंडे सारी।।धृ।।


तोंडाचे बोळके

पण पिते माझ्झा

आम्हाला म्हणते

द्याना जरा पिझ्झा

दुडक्या चालीने

मारते हो फेरी।।1।।


कानाला लावते

हेडफोन छान

आवडतो तिला

गुरुदास मान

केसांचाही केला

बॉबकट भारी।।2।।


ग्रॅनिचे आमच्या

वय आहे साठ

अभंग न ओव्या

सारे तिला पाठ

अजुनी करते

पंढरीची वारी।।3।।


घालून पाहते

जीन्स अन् मिडी

जोडून ठेवल्या

तीन तीन पिढी

संवादाची तिची

रीत खुप न्यारी।।4।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children