STORYMIRROR

Shila Ambhure

Children

3  

Shila Ambhure

Children

सर्कस आणि विदूषक

सर्कस आणि विदूषक

1 min
28.1K


गावात आली

सर्कस जम्बो.

विदुषकाचे

नावच रेंबो.

सदरा त्याचा

झालरीवाला.

गोंड्याचा नाडा

सलवारीला.

रेशमी गोंडा

टोपीला शोभे.

झोपाळ्या वर

जोकर उभे.

खोटे रडतो

उगा हसतो.

डोळे मिटुन

पाय टाकतो.

नकला करी

जीभ दावून.

हसती सारे

पोट धरून.

स्वतःचे दुःख

उरी दाबतो.

हसवाया तो

जगी राबतो.

सर्कस जाते

गावाला जिथे.

विदूषक हा

नेहमी तिथे.

अतूट नाते

हे त्या दोघांचे.

सर्कस आणि

विदुषकाचे.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children