STORYMIRROR

कदम .के.एल.

Children Stories Fantasy Children

4  

कदम .के.एल.

Children Stories Fantasy Children

फुलांनी भरली होती बाग

फुलांनी भरली होती बाग

2 mins
240

१}

फुलांनी भरली होती बाग

फुलांमध्ये फिरत होता वाघ

त्याला दिसला नाग आणि

वाघाने मारली टांग 


फुलांनी भरली होती बाग

फुलांवर बसली माशी

मधमाशी आली आणी

तिने मारली तीला नांगी


फुलांनी भरली होती बाग

तिथे आली चिमणी

चिमणी फुले वेचू लागली

बाग मतर लाजरी झाली 


फुलांनी भरली होती बाग

बागेमध्ये आला मोठा हत्ती 

हत्तीने घेतला फुलांचा वास

फुलांना कसलाही झाला नाही ञास


फुलांनी भरली होती बाग 

तिथे आले पर्यटक;

काय होते एक एक नग

पिशवी भरून फुले त्यांनी

घेतली ना काढून मग


फुलांनी भरली होती बाग

तिथे आला माळी

माळीने घातले पाणी

फुलांनी दिली एकमेकांना टाळी

💮💮💮💮💮💮💮💮💮💮


२}

पुस्तक वाचावं रोज रोज नविन ज्ञान घ्यावं

गणिताचं अथवा विज्ञानाचं नित्य एकतरी पुस्तक वाचावं

शब्दसंग्रह वाचावा वाचावा इतिहास

दुर दुर पळवावा बघा अज्ञानाचा फास


वाचन करून होशील चांगल्या मार्कने पास

मोडकळीस निघेल नापास होण्याची भिती हमखास

एक एक पाठ समजून घ्यावा समजत नाहीतर विचारून घ्यावा

वाचनाचा तुम्ही छंद चांगला जोपासावा

वाचनाचा छंद तुम्ही चांगला जोपासावा

💮💮💮💮💮💮💮💮💮💮

३}

शाळा हो शाळा तिथे लिहण्यासाठी फळा

अभ्यासाचा लळा आणि शिक्षणाची धुळा

शाळेमध्ये ज्ञान तीथे ज्ञानला उजाळा

शाळामध्ये जावावं लावावा ज्ञानाचा टिळा

गुरूजी शिकवतात वाचन आणि लेखन

शाळेमध्येच असतो होऽऽ विषयांचा मळा

गुणानुसार श्रेणी देतात घालतात उत्कृष्ट शिष्यास माळा

रोज हजेरी लावतो मी तुम्ही पण शिस्त शाळा


शाळा हो शाळा तिथे लिहण्यासाठी फळा

अभ्यासाचा लळा आणि शिक्षणाची धुळा

💮💮💮💮💮💮💮💮💮💮

४}

झाडांनो फुलांनो 

पानांनो

वृक्षांनो नद्यानों

वनांनो 

ऐकवा तुमची कथा

ऐकवा तुमची व्यथा

कालकालांतराच्या साक्षीदारांनो

माझ्या कवितेच्या शब्दांनो

सांगा कसं वाटतंय ? या निसर्गरम्य परिसरामध्ये

ऐका लगबग करणार्या रान पाखरांनो

💮💮💮💮💮💮💮💮💮💮

५}

पाऊस पडतो रिमझिम रिमझिम

थेंबाचे स्वर टिपटिप टिपटिप

पाण्याचा लोट खळखळ

डोंगरांमधुनी वाहतो नळनळ


पानझाडी करती सळसळ

पवनेची चालु होते चळवळ

गांढुळ मातीत करते वळवळ

चिलटांमुळे होते मळमळ


पानांनाही होते हळहळ

वाढीस लागता फळफळावळ

किरणे उन्हांची करती तळतळ

ढग पसरते काळंकाळं


घास गवत हसते खळखळ

उन्हांची पावसामध्ये पडता झळझळ

गढूळ पाणी करते जळजळ

पावसाने येते धरतीला बळच बळ

💮💮💮💮💮💮💮💮💮💮

-कुमार्कवी 


Rate this content
Log in