दानवी प्राणी चक्र
दानवी प्राणी चक्र


पानांना खाते अळी
अळीला खातो पक्षी
पक्षांना पकडून प्राणी
होतात त्यांचे भक्षी
प्राण्यांना पकडतात प्राणी
घाबरून राहतात बाकी
भयंकर असतात प्राणी
जे असतात मांसाहारी
मुंगी खाते धान्य
मुंगीला खातो साप
साप मारते मुंगस
मुंगसावर कुञ्याचा चाप
डुक्कर खाते शेत
शेताला खातो माणूस
सगळे प्राणी दानवी
नसते लक्षण मानवी