STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Children Stories Others

4  

प्रतिभा बोबे

Children Stories Others

महत्त्व स्वच्छतेचे

महत्त्व स्वच्छतेचे

1 min
230

सुंदरबनात एकदा भरली

सभा सगळ्या प्राण्यांची 

विषय फारच गंभीर होता 

झाली होती टंचाई पाण्याची 


मनसोक्त डुंबायला हत्तीदादाला

मिळत नव्हते पाणी 

तहान भागेना पिलांची म्हणून 

वैतागली होती जंगलाची राणी 


सगळेच प्राणी त्रासले होते 

वारंवारच्या या पाणीटंचाईला 

जमले होते म्हणूनच सगळे

उपाय यावर शोधण्याला 


सिंहमहाराजांनी सुचवला 

उपाय हा नामी 

करु सफाई तळ्याची 

पाणी पडणार नाही कमी


सर्वांना पटला हा उपाय 

कामांची केली प्रत्येकाने वाटणी 

तळयातला गाळ केला साफ 

धो- धो पावसाने साठले भरपूर पाणी


चिंता मिटली पाण्याची म्हणून 

सगळेच गेले आनंदून

सगळ्यांनाच समजले होते आता 

सफाईमुळे झाले संकट दूर 


सिंहमहाराज म्हणाले सर्वांना

सफाईमुळे दुर झाली पाणीटंचाई

आता आपल्याला पाण्यासाठी 

माणसाच्या वस्तीत जावे लागणार नाही 


Rate this content
Log in