STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

3  

प्रतिभा बोबे

Others

माझी माय मराठी

माझी माय मराठी

1 min
135

काय सांगू रुबाब बाई

माझ्या मायमराठीचा

प्रत्येक अक्षराने जपला

वारसा लेखनसंस्कृतीचा


साज श्रीमंतीचा मराठीला

वर्ण आहेत हिच्यात बावन्न

बावन्न वर्णात सामावले साहित्य

भाषा किती माझी आशयसंपन्न


स्वरचिन्हे हिची शोभती

अलंकारच जणू सुवर्णाचे

व्याकरण,अलंकार असती

साज सुंदर पर्वणीचे


कधी कधी होतो मात्र

शब्दांमुळे मोठा जांगडगुत्ता

एकाच अर्थाचे कित्येक शब्द

गाजवती मनामनांवर सत्ता


अपयश येता पदरी कुणाच्या

म्हणती त्याची झाली 'हार'

यश मिळता जीवनी कुणाला

त्याच्या गळ्यात बघा पडतो 'हार'


अशी ही मराठी मायमाऊली

अखंड हिच्यात

 लेखनसंपत्तीचा वारसा

सामर्थ्य इतके हिच्यात सामावे

जिंके माझी मराठी अमृतातही पैजा


Rate this content
Log in