STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Inspirational

4  

प्रतिभा बोबे

Inspirational

स्त्री

स्त्री

1 min
254

रुप देवाजीचे असे जिच्याठायी

द्वार स्वर्गाचे खुले तिच्या पायी

स्त्रीच्या प्रत्येक रुपात नवलाई

प्रतिमुर्ती ईशाची ती असते आई


लेक असते चैतन्य घराचे

लेक असते सौंदर्य घराचे

लेक असते अभिमान घराचा

लेक स्वाभिमान सासरमाहेराचा


राखीच्या पवित्र धाग्याची ओढ

जगी नाही बहीणभावाच्या नात्याला तोड

सुखदुःखात साथ न सोडी भावाची

नाही येणार सर कुणाला बहिणीच्या प्रेमाची


जीवनसंगिनी सातजन्माची

छाया असते नेहमीच पतीची

हाती घेऊन दोरी कर्तव्याची

शृंखला ठेवी बांधून नात्यांची


स्त्री असते रुप आदिशक्तीचे

कधी रुप ती सौदामिनीचे

प्रत्येक रुपात स्रीला द्या स्थान सन्मानाचे

प्रसंगी देऊन प्राण करा रक्षण स्त्रीशीलाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational