STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

4  

प्रतिभा बोबे

Others

मी सावित्री बोलतेय

मी सावित्री बोलतेय

1 min
352

ज्योतिबांची सावित्री मी 

साताऱ्याच्या नायगावी जन्मले

घेऊन पावन वसा शिक्षणाचा

सावित्रीच्या लेकींची क्रांतीज्योती झाले


नव्हता गंध मुळी शिक्षणाचा

आवड होती शिक्षणाची परी अज्ञानी मी

ज्योतिबांची साथ म्हणून झाले साक्षर

पहिली स्त्री-शिक्षिका अन् मुख्याध्यापिका मी


सोसले बोल विखारी अन् मारा दगडधोंड्यांचा

शेणाच्या माऱ्यानेही विश्वास परी नाही डगमगला

करण्या साक्षर माझ्या बंदिनी लेकींना 

वसा स्त्रीशिक्षणाचा मी आत्मविश्वासाने घेतला


लेकींनो हरेक क्षेत्रात तुम्ही आहात अग्रेसर

पाहून तुमची प्रगती आहे मी समाधानी

होते ज्योतिबांची सावित्री म्हणून 

करु शकले तुम्हांला साक्षर अन् ज्ञानी


Rate this content
Log in