STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

4  

प्रतिभा बोबे

Others

मी पेन बोलतोय

मी पेन बोलतोय

1 min
1.1K

पेन बोलला पेन्सिलला 

पुराणापासून आहे माझी महती

टाक, बोरु,लेखणी अन् पेन आता 

बघ ना माझी रुपे कितीकिती


पुराणकाळापासून मी आहे

सोबती लेखनवेड्या जनांचा

मनातील गोष्टी कोऱ्या कागदावर उतरवणारा

मनकवडा सखा कित्येक कवीमनांचा


एक लेखणी करु शकते परिवर्तन

हा प्रत्यय आलाय गं सर्वाना कितीवेळा

कधी भेट म्हणून, कधी बक्षीस म्हणून

जातो मी सर्वांकडे वेळोवेळा


मी आहे म्हणून जिवंत राहतात

शब्द तुमच्या भावूक, हळव्या मनातले

स्थान माझे अढळ आहे बाळा

सर्वांच्याच जीवन अन् शिक्षणातले


Rate this content
Log in