STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Others

4  

प्रतिभा बोबे

Others

साने गुरुजी

साने गुरुजी

1 min
117

करील जो मनोरंजन मुलांचे

जडेल नाते प्रभूशी तयाचे

हेच होते सार जीवनाचे

आपल्या लाडक्या सानेगुरुजींचे


गोष्टींतून दिले संस्कारमोती

कवितांतून शिकवली देशभक्ती

गांधीजींची विचारसरणी आचरती

जगाला संदेश प्रेमाचा देती


शिकवली आईने सदभावना

नको दुखवू कुणाच्या मना

असते रे मन मुक्या कळ्यांना

नाही दिला फाटा आईच्या संस्कारांना


पांडूरंगाने विठूमाऊली मुक्त केली

दर्शनरांग सर्वांसाठीच खुली झाली

जातीभेद,अस्पृश्यता नाही भावली

मानवतावाद,समाजसुधारणा साहित्यी दिसली


'शामची आई' जगी प्रसिद्ध झाली

यशोदेने यशोदा पुन्हा जिवंत केली

जगाला संस्कारज्योत जिने दिली

सानेगुरुजींना सदभावनांची स्नेहांजली


Rate this content
Log in