STORYMIRROR

प्रतिभा बोबे

Tragedy

3  

प्रतिभा बोबे

Tragedy

व्यथा बळीराजाची

व्यथा बळीराजाची

1 min
306

देवा सांग कशापायी

घेतो माझी तू परीक्षा

सांग कोणत्या पापाची

भोगतूया मी रे शिक्षा


रानामंदी दिसरात

ढोरावानी मी राबतो

नाही सीमाच कष्टाला

तितं घाम मी गाळतो


कशी बेगमी वर्षाची

करू सांग मला आता

तुझा जगाचा पोशिंदा

असा उपाशी राहता


पावसाच्या खेळापायी

खेळ झाला रं शेताचा

त्याने पिकवले शेत

झाला काळ तो पिकाचा


पीक येता मुबलक

भाव मिळंना मालाला

डोई डोंगर कर्जाचा

घोर लागला जीवाला


ईडापिडा आता देवा

जावो आमच्या पाठची

राज्य येवो रे बळीचं

हीच आस रे मनाची


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Tragedy