काय काय करावं...
काय काय करावं...
करायला खुष तुला काय काय करावं लागतं,
तुझ्याचसाठी कणाकणानं रात्रंदिवस मरावं लागतं.
नाही भागलं तेवढ्यानं तर मागं पुढं फिरावं लागतं,
आणि कधी कधी मनातल्या मनात झुरावंही लागतं.
या वेड्या पिशा जीवाला सारंच कसं झेलावं लागतं,
अन उशीखाली डोकं घालून मुळूमुळू रडावंही लागतं.
वेळ आली तर दुःख बाजूला सारून हसावंही लागतं,
करायला खुष तुला काय काय करावं लागतं.
