बाप
बाप
बाप हा दुसरा तिसरा कोणी नसतो,
तो तर एक देवाचा अवतार असतो.
जरी बाप असला साधा भोळा,
तरी नसतो तो मातीचा गोळा.
वापरतो फाटके बनियन फाटकी चप्पल,
नका समजू त्याला नसते अक्कल.
मुळातच बाप माणूस असतो साधा,
होत नाही त्याला कशाचीच बाधा.
त्यालाही असते एक हृदय धडधडणारे,
अन दोन नयन हे पाझरणारे.
नसेल करत आई एवढी माया,
पण कुटुंबासाठी झिजवतो काया.
भले मुलांचे जो पाहतो,
तोच खरा बाप असतो.
असा हा बाप साऱ्यांनाच मिळतो,
पण तोप्रत्येकालाच कळत नसतो.
