तूच तू...
तूच तू...
मनी आज हा
वसंत फुलला,
झोपाळ्या वाचून
झुलाही झुलला.
बघ सोसवेना
भार हा मदनाचा,
येतो रे महापूर तो
तुझ्याच आठवणींचा.
बघ ना रे जीवलगा
घायाळ मी हरिणी,
वाट पाहते मी रं
शृंगार असा हा करुनी.
स्पर्श तुझा तो आठवूनी
येती अंगावरी शहारे,
तुजविण मी राहू कशी
सांग ना सख्या रे.

