STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

4  

Meenakshi Kilawat

Romance

इश्काचा सागर

इश्काचा सागर

1 min
295

राया तुम्ही इश्काचा सागर मी प्रीतिची सरिता

आलेय सोडून मी घरदार माझे तुमच्याकरिता ||धृ||


 नेसली मी आज साडी चंद्रकळा टिपक्याची 

 पैठनी माझी भरजरी ,ही रेशमी धाग्याची

नका पदर ओढू सजना,माझा कोमल शेला,,

आलेय सोडून मी घरदार माझे तुमच्याकरिता....


करण कुंडल कानात बोलती 

 कंकन पाटल्या बाजूबंद हाती

नका हात ओढू सजना,शपथ आहे प्रेमाची,, 

आलेय सोडून मी घरदार माझे तुमच्याकरिता ...


पायाचे पैंजन किनकिन करती

जोडवी बोटातील कसकस करती

नका रास खेळू सजना असा श्वास माझा भरला,,

आले सोडून मी घरदार माझे तुमच्याकरिता...


हा वेणीतला मोगऱ्याचा सुंगधी गजरा

 करी धुंद आसमंत मनाचा सारा

झरोक्यातून बघे चंद्र तारका नजारा

नका छेडू सजना माझी गोड बोलून बाता,,

आले सोडून मी घरदार माझे तुमच्याकरिता...


कदर जाण प्रिया,तू माझ्या प्रेमाची

कसली ही गोडी मी नाही परी गुणाची

तुझी छाया माया मज वेड लाविती

लाज येई मला भारी, आपली प्रित निराळी,,

आले सोडून मी घरदार माझे तुमच्याकरिता...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance