STORYMIRROR

Sushama Gangulwar

Romance

4  

Sushama Gangulwar

Romance

सख्या तू भेटला

सख्या तू भेटला

1 min
322

एकट्या जीवाला 

सख्या तू भेटला 

पहिल्याच भेटीत 

मनाला भावला 


तुझा सहवास मला 

सख्या हवासा झाला 

खूप कमी वेळात 

जीव तुझ्यात गुंतला 


जीवन होते माझे 

अगदीच बेरंग 

तुझ्या येण्याने जीवनात 

भरले सप्तरंग 


थकलेल्या जीवाला 

आधार तुझा मिळाला 

खरा अर्थ जीवनाचे 

तुझ्या संगतीत कळाला 


प्रीतीने तुझ्या मी 

कधी एकटी ना राहीली 

स्वप्नात तुझ्या सख्या 

जीवन गाणी गायली 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance