"रोज डे"
"रोज डे"
तरुणाईच्या उंबरठ्यावर
एक चांदवा झुलला गं....
हृदयातील तो नाजूक कप्पा
वळणावरती हलला गं....
हुरहूर लावणारा क्षण कोवळा
तुला पाहुनी भुलला गं .....
वाटेवरती तुज रोज पाहता
जीव गुलाबी फुलला गं .....
धडक गोड ती घडवून आणली
अंदाज काही न चुकला गं....
कुठे मनाच्या खोल तळाशी
तृप्त मळा तो पिकला गं......
ओळख झाली, स्मितहास्यही
प्रेमात एक गड चढला गं......
कसे सांगू परि तियेसी आता
जीव तुझ्यावर जडला गं......
गुलाब देऊन "रोज डे" स मी
पुसले इरादा का कळला गं...?
तुझ्यात मी झालो दिवाणा
प्रेमात कलेजा मळला गं......