वर्हाडी कविता प्रेम
वर्हाडी कविता प्रेम
तूयाशी बोलता बोलता
शब्द सुचत जातात
मन माय मोकय होते
घाव भरत जातात
तुया त्या चेहर्यामध्ये
मले मेनका उर्वशी दिसते
मी होईन इंद्र तुया
तू नसण्याच दुःख भासते
दहावीत होतो तवा
प्रेम हाच होता पक्ष
अभ्यासात नाही लागे मन
रोज तूयावरच लक्ष
आज ही आठवते मले
तुया लाजण्याचा अर्थ
प्रेम मायावरच होत तूय
ना बोलता झालं आता व्यर्थ

