वेड प्रेमाचे
वेड प्रेमाचे
तुला रोज पाहण्याचा
बहाणा मी शोधतो
वाट माझी सरळ तरी
तुझ्यासाठी वळतो
रोज राती जागवी
कमलनयन तुझे गं
किती मना आवरू
तुझी पडे भूल गं
सागरात उठणारी
लहर जशी खळखळ
शब्द तुझे मधूर ते
'मना' करी अवखळ
ध्यास मला एक तुझा
छंद नसे वेगळा
असा कसा जीव माझा
सखे तुझ्यामध्ये गुंतला

