STORYMIRROR

Savita Kale

Others

3  

Savita Kale

Others

आम्ही सावित्रीच्या लेकी

आम्ही सावित्रीच्या लेकी

1 min
183

अज्ञान तिमिर दूर करण्या

एक क्रांतीज्योत तेवली

ज्योतिबांची सावित्री तू अन्

अनाथांची माय माऊली।। 


आस एकचि मनी

ध्यास एक घेऊनी

तलवार विद्येची करि

उतरली रणांगणी।। 


रात काळोखी जरी

स्वप्न तेजस्वी उरी

स्त्री शिक्षणा झिजवला

देह उभा चंदनापरी।। 


अवघड होत्या साऱ्या वाटा

मार्ग काट्याने भरलेला

परिस्थितीशी झुंज देउनी

सुरू केली मुलींची शाळा।। 


ममतेचे छत्र दिले

यशवंत बाळाला

केशवपन, सतीबंदी

विरोध बालविवाहाला।। 


चूल मूल पलीकडचे

विश्व दिसे या डोळा

गुरफटलेला श्वास होता

झाला एकेक मोकळा। । 


क्षेत्र असो कोणतेही

अढळ अस्तित्व उभारू जगी

नाही पडणार कोठे कमी

आम्ही सावित्रीच्या लेकी।। 


Rate this content
Log in