म मराठीचा
म मराठीचा
ज्ञानियांचा राजाही
सांगे जिची महती
अशा माय मराठीची
काय वर्णावी कीर्ती
माझ्या मराठी भाषेत
असे आपुलकीचा गंध
शब्द ओठांवर येता
मिळे मनाला आनंद
रूप मराठी भाषेचं
जसे वळवा वळते
तिचे अनोखे सौंदर्य
कळणा-यालाच कळते
बहु अलंकारे नटली
माय मराठी ही माझी
श्वास आणि ध्यास अमुचा
माय मराठी ही माझी