शिक्षक
शिक्षक
संस्काराची ठेवण
आयुष्याला लागे वळण
शिक्षकांमुळेच घडते
आपले शुद्ध आचरण।।१।।
क्षमाशील स्वभाव
नाही मनी दुजाभाव
शिक्षकांमुळेच होते
जगामध्ये आपले नाव।।२।।
जीवनात येते आशा
अंधारात दावी दिशा
शिक्षकांमुळेच कळते
जीवनाची परिभाषा।।३।।
