STORYMIRROR

Savita Kale

Inspirational

3  

Savita Kale

Inspirational

तू

तू

1 min
437

इतिहासाच्या प्रत्येक पानावर

जाहली पुरती साहसी तू

कधी आई, कधी बहीण

कधी कुणाची प्रेयसी तू 


प्रेमाची परिभाषा सांगणारी

मनमोहनाची मीरा तू

रणांगणी तलवार घेऊनी

लढणारी झाशीची राणी तू


पुत्र घडवला शिवबांसारखा

महाराष्ट्राची ऊर्जा तू

बनून अनाथांची आई

मानवतेला दिला दर्जा तू


स्त्री शिक्षणासाठी झटणारी

ज्योतिबांची सावित्री तू   

अज्ञानाचा काळोख चिरणारी

एक तेजोमय ज्योत तू


इतिहास कालचा तेजस्वी 

अन् उज्ज्वल उद्याचे भविष्य तू

इतिहासाच्या प्रत्येक पानावर

जाहली पुरती साहसी तू  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational