मायबोली मराठी
मायबोली मराठी


मराठी केवळ भाषाच नाही
नात्यांची गुंफण आहे
हृदयाशी जोडलेले
आपुलकीचे बंधन आहे
कधी रसाळ, मधाळ
तर कधी रांगडी आहे
माझ्या माय मराठीची
अमृताहुनी गोडी आहे
मातीच्या कणाकणात अन्
मनामनात ती वसली आहे
शब्दांचे अलंकार लेऊनी
माय मराठी सजली आहे
अभंग, ओव्या, पोवाडे,कीर्तनी
संतांनीही वदली आहे
अन्यायाच्या प्रतिकारासाठी
लेखणीतून लढली आहे
संस्कृतीचा दिला वारसा
तेजस्वी तिचा इतिहास आहे
काय वर्णावी तिची महती
मराठी आमचा श्वास आहे