Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Inspirational

3.7  

Sarika Jinturkar

Inspirational

प्रिय दिनदर्शिका

प्रिय दिनदर्शिका

2 mins
243


रोज दिवस उगवतो  

मावळतो ही

मावळणारा सूर्य पुन्हा नव्याने उगवतो ही  


सरकत राहते वेळ मुंगीच्या पावलांनी

 दिवस बदलतात तशा 

बदलत जातात तारखाही  


कळलेच नाही कसे बघता, 

बघता वर्ष संपले 

जुन्या त्या आठवणीत मन मग हे अडखळले  


नवीन वर्षाच्या निमित्ताने हे, दिनदर्शिका

 तुला लावले जाते भिंतीला 

महिन्यात काय काय घडले लिहीत

 राहते मी त्या त्या तारखेला 

 तुला बघून वाटले 

कालच्या घडलेल्या घटना खूप काही शिकून गेल्या 

कसे..? जगायचे ते सांगून गेल्या

 उद्याचे स्वप्न रंगावे कसे? जीवनाचे महत्त्व मांडून गेल्या 


 आज ही पाने चाळता चाळता सहज विचार आला मनात आयुष्याची एक एक वर्ष उलटून जातात

 किती सहज अन् क्षणात  


सुखद आठवणी होतात ताज्या

 मनाला जाणवतो सुखद गारवा, 

काही तारखा तर डोळ्यात पाणीही आणतात आणि काही ऊन सावलीच्या खेळात आयुष्य रंगवतात...


 दिवस आठवणीत राहावे म्हणून त्या तारखेला कसे खाणाखुणा 

विसरू शकत नाही तुझ्यामुळे  

 दिनांक ,वार ,महिना वर्षासह 

तिथीचीही मिळते माहिती 

 पौर्णिमा अमावस्या सोबतच कळते केव्हा आहे चतुर्दशी 


 डोळ्यासमोर येताच पुन्हा पुन्हा 

पेपरवाला चा महिन्याचा हिशोब 

दूधवाला, किती झाले खाडे 

तुझ्यावर लिहिले जाते किरायाचे भाडे 


आम्हा गृहिणीची रोजनिशी

 तूच दिनदर्शिका 

 पावलोपावली आम्हाला मदत मिळते 

तूच आहे आमची खरी मार्गदर्शिका  


वसंता मागून ग्रीष्म आणि शरद

 नंतर शिशिर ही येतोय 

वर्षानुवर्षे बस तेच आहे

 हे समजण्यास आता थोडा उशीर होतोय  

हा प्रवास फक्त एकाच दिशेला मागे फिरण्याची सुटत नाही 

रोजचा दिवस आयुष्यात नवा

मागे फिरता जुने काही मिळत नाही  

 

फुलपाखरामागे धावताना बालपण ही पळून जाते तारुण्याच्या उंबरठ्यावर स्वतः मग ते फुलपाखरू होते  

दिवस बदलतात, बदलतात तुझी पानेही 

भिंतीही बदलू लागल्या आहेत आजकाल 

बदलली आहेत मने ही 

आपण तिथेच अडकून पडतो 

थांबत नाही कधीच काळही 


 अशा अगणित तारखा येऊन जातात वर्षभरात आणि वर्षाचा शेवटी मागे वळून बघताना मनात एकच वेगळीच हुरहुर तशीच राहते टिकून,

 आता येईल पुन्हा नवीन दिनदर्शिका आयुष्याच्या वेगवेगळ्या तारखा घेऊन ....


पण आलेल्या नवीन दिनदर्शिकेला 

एकच विनंती 👏

सर्वांकडे असू द्यावी सन्मती 

वाचतील जे कविता त्यांच्यावर खूश असो नेहमीच नियती😊☺️


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational