हेळसांड
हेळसांड
मुलगा, मुलगी धर समान तू मानवा
आता नको हेळसांड मुलीची करू
मुलासारखीच तिला वागणूक दे
मानवा मुलासमान शिक्षण कर तिला सुरू...
मुलगा असेल दिवा वंशाचा
मुलगी आहे दोन्ही घरची पणती
दीप लावते मुलगी दोन्ही घरचा
घराला घरपण मुलगीच ना देती....
सावित्रीने ज्ञानाची ज्योत पेटवली
स्वतः झगडली पण मुलींना शिकवले
rgb(55, 71, 79); background-color: rgb(255, 255, 255);">पाया शिक्षणाचा रोवला सावित्रीने
मुलींना स्वतःच्या पायावर उभे केले...,
माय आता मुलगी झाली म्हणून
दुःखी होऊ नको,सुखात वाढव तिला
मुलगी तुझ्या वंशाचे सारे पांग फेडेल
पारावार नाही राहणार तुझ्या आनंदाला....
मुलगी होणार म्हणून गर्भातच तिला
खुडू नका,काय तिचा दोष आहे
जग तिलाही पाहू दे ग माय
मुलीचे हसरे रूप तू डोळे भरून पाहे....