आईशपथ
आईशपथ
राम, श्याम चालले शाळेला
दफ्तर त्यांच्या खांद्याला.....
डबा, बाटलीची पिशवी हातात
चाललेत ते शाळेला रमतगमत....
मधेच भेटले एक जख्ख आजोबा
त्यांचा त्यांच्यावर नव्हता ताबा...
रस्ता ओलांडण्यासाठी ते थांबले
राम, श्यामने त्यांचे हात धरले....
रस्ता त्यांना ओलांडून दिला
पण शाळेला जरा उशीरच झाला..
परिपाठ, प्रार्थना होती झालेली
वर्गात सारी मुले होती गेलेली....
उशीर झालाय आले लक्षात खरे
काय करावे हे समजेना खरे...
उशीर झाला म्हणून शिक्षक आले
उठाबशा काढायची शिक्षा देऊ लागले...
राम म्हणाला आईशपथ थांबा सर
खोटं नाही आम्ही बोलणार बर...
रस्ता ओलांडायला आजोबांना मदत केली
म्हणून आमची शाळेची प्रार्थना हुकली...
सरांनी त्यांचे सारे घेतले ऐकून
शाब्बासकी दिली चांगले काम केले म्हणून...
