ज्ञानदेवता
ज्ञानदेवता
1 min
20
*ज्ञानदेवता*
विद्याधन हे शब्दांचे
ज्ञानाचे अन पावित्र्याचे
पाटीवर अ आ इ गिरवूया
शब्द बनवूया अक्षरांचे...
विद्या हे शस्त्र दुधारी
तळपत्या तलवारीसारखे
म्यानातून बाहेर काढताच
चालते हे तेजासारखे....
करूया सारेजण वंदन
मनापासून ज्ञानदेवतेला
आणूया ओठी नाम
नमन या सरस्वतीला....
ज्ञानाचे दीप लावूया
सरस्वतीच्या मंदीरी
उपक्रम अन प्रकल्पाने
मुलं घडवूया संस्कारी....
वसुधा वैभव नाईक
,पुणे
मो. नं. 9823582116
