हॅलो हॅलो चांदोबा
हॅलो हॅलो चांदोबा
1 min
7
आभाळात चांदोबा एक
चांदण्या आहेत अनेक...
गाईला शिंगे आहेत दोन
हॅलो हॅलो चांदोबा तू उचल फोन...
रिक्षाची चाके आहेत तीन
नेहा तू अक्षर गिरव पीन....
गाडीला चाके आहेत चार
गणपतीला घालू जास्वंदी हार...
नीता बांगड्या मोज तू पाच
हाताला लागून घेऊ नको काच...
सई तू अक्षर गिरव सहा
मग आरशात जाऊन पहा.....
गगनी आहेत ऋषी सात
अपंगावर करूया मात....
घड्याळात वाजलेत आठ
स्वच्छ करावा नेहमी माठ....
सरिताने मोजले मणी नऊ
आजीचा हात खूप मऊ....
वर्गात मुले आहेत दहा
मुलांनो पिऊ नका बर चहा...
